Thane Municipal Corporation
घनकचरा विभाग
विभाग प्रमुख श्री. अशोक बुरपल्ले (उप आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३१५९०, +९१-      विस्तार क्रं. - २०१/२०६
ई-मेल dmcswm@thanecity.gov.in
विभागाची कामे:
ठाणे महानगरपालिकेची स्थापना दि. १ ऑक्टोबर १९८२ रोजी झाला असून, एकूण क्षेत्रफळ १२८ चौ.कि.मी. आहे. सन २००१ साली झालेल्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १२.६१ लक्ष असून सन २००१ मध्ये १८ लक्षच्या जवळपास आहे. ठाणे शहरामध्ये दैनंदिन ६०० ते ६५० मेट्रिक टन घनकच-याची निर्मिती होते.
 • कच-याची विल्हेवाट : ठाणे महानगरपालिकेकडे स्वत:ची क्षेपणभूमी उपलब्ध नाही. ठाणे महानगरपालिकेस घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकरिता सर्व्हे नं.१५,१६,१७,१८ हे मौजे डायघर येथील १९ हेक्टर भूखंड शासनाकडून जून २००४ मध्ये प्राप्त झाला असला तरी स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळेसदर ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही करता आलेली आहे. सद्य:स्थितीत ठाणे महानगरपालिकेकडे स्वत:ची क्षेपणभूमी नसल्यामुळे, महापालिका क्षेत्रातील खाजगी मालकीच्या जागेवर,जमीन मालकाच्या परवानगीने मुंब्रा प्रभाग समिती हद्दीतील खर्डी गावामध्ये भूमापन क्रमांक न.सं. ३८/१, ३८/२, ३८/३, ३८/४, ३८/५, ३८/६, ३८/७ पैकी १५ एकर जमिनीवर कच-याचे डंपींग करण्यात येत आहे. परंतु काही वेळेला नागरीकांकडून सदर ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध होत असतो. सदर कच-याचेसपाटीकरण करून त्यावर दुर्गंधीनाशक व जंतुनाशकाची फवारणी करण्यात येऊन, आवश्यकतेनुसार मातीचा भर देण्याची कार्यवाही केली जाते. जागा मालकाची परवानगी असल्यास सुमारे दिड ते दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत सदर जागेचा उपयोग करणेशक्य होईल.
 • जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट : जैव वैद्यकीय घनकचरा नियम १९९८ ची अंमलबजावणीचे अनुषंगाने शहरातील रुग्णालये, दवाखाने येथे निर्माण होणारा जैव वैद्यकीय घनकच-याचे संकलन वाहतुक व विल्हेवाट लावणेकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात बिओटी तत्वावर पर्यावरण दक्षता मंच या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रकल्प उभारून जैव वैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट लावण्यात येते. घनकच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करणेकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विल्हेवाट लावण्यात येते. सदर संस्था ठाणेमहापालिका हद्दीतील रुग्णालये, दवाखाने यांच्याकडून मा. महासभेने निश्चित केलेल्या दरानुसार आकारणी करून रुग्णालयाकडील जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्याचे काम करीत आहे.
 • वनखात्याकडील खाणी घनकचरा विल्हेवाटीसाठी उपलब्ध करून घेणेबाबत:

  डायघर येथील घनकचरा प्रकल्प होईपर्यंत वन विभागाचे अखत्यारीत ठाणे महानगरपालिका परिसरातील बंद पडलेल्या खाणी २ वर्षेच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत वन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला असून ठाणे महानगरपालिकेने १) मौजेगायमुख, घोडबंदर रोड पासून १०० फुटाच्या अंतरावर ५ एकरपेक्षा जास्त क्षेत्राच्या दोन बंद पडलेल्या खदान / खाणी २) मौजेशिळ येथील राखीव सर्व्हेनं. २१८-अ, क्षेत्र-१ हेक्टर बंद पडलेली दगड खाण उपलबध्द करून देणेबाबत मा.प्रधान सचिव महसूल सव वनेमंत्रालय, मुंबई यांना पत्र क्र.ठामपा/आयुक्त/घकव्य/८१४/४३९३ दि.२२/१२/२०१० अन्वये प्रस्ताव सादर केला आहे.

  टाकून भराव करून वृक्ष लागवडीचा प्रस्ताव दि. २६/११/२०१० रोजी वन विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्याकामी येणारा सर्व प्रकारचा खर्च करून भराव करून वृक्ष लागवड करून वनक्षेत्राचे पुनर्रस्थापन करून विकासानंतर जमीन वनखात्याकडे हस्तांतरण करून देण्यात येणार आहे. त्यानुषांगाने त्रिपक्षीय करारनाम्यांच्या मसुदा दि.०१/०६/२०११ रोजी अंतिम करण्यासाठी वन विभागाकडे देण्यात आलेला आहे.

 • बायोमिथेनायझेशन प्लांट:

  कळवा येथील छत्रपती महाराज रुग्णालयाच्या आवारा सन २००५ मध्ये "महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग अँण्ड इंडस्ट्रीज"( MCHI ) यांच्या मार्फत शिवाजी रुग्णालय येथे बायोमिथेनायझेशन प्लांटची उभारणी करून ठाणे महानगरपालिकेस सदर प्रकल्प विनामूल्य हस्तांतरित केलेला आहे. सदर प्लांटमध्येतांत्रिक सुधारणा व पुढील पाच वर्षासाठी देखभाल करणेकरिता मा. महासभा ठराव क्र. ५२५ दि.१९/१२/२००७ अन्वये मान्यता दिलेली आहे.

  त्यानुसार निविदा मागविण्यात येउन लघुत्तम निविदाकार मे. इम्प्रोटेक सोल्युशन यांची रक्कम रु. ७५ लक्षाची निविदा मा.स्थायी समिती ठराव क्र.१६१७ दि.१७/१०/२००८ नुसार मंजूर करण्यात आलेली आहे.

  निविदाकारास ७५ लक्ष रुपये पाच वर्षात म्हणजेच मासिक सलग ह्प्त्यात द्यावयाचे असून प्रतिमहा रक्कम रु.१,२५,०००/- याप्रमाणे रक्कम देखभालीपोटी ठेकेदारास अदा करावयाची आहे.

  सदर प्लांटची क्षमता १५ टन इतकी असून Biogas तयार करण्याची क्षमता ६५० क्युबिक घन मिटर / प्रतिदिवस इतकी आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल, मॉलमध्येनिर्माण होणारा ओला कचरा सदर प्लांटसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून या करिता स्वतंत्र ६ घंटागाडयांची व्यवस्था करण्यात आली असून ३५० ते४०० युनिट वीज निर्मिती दररोज होत आहे.

 • ठाणेमहानगरपालिकेची हस्तांतरण स्थानक: सद्यस्थितीत मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील खर्डी येथे खाजगी जमिनीवर मालकाचे परवानगीने कच-याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. सदर जागेवर जाणारा रस्ता अरुंद असल्याने व सदरचे अंतर विचारात घेता कळवा व मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातील कचरा सी. पी. तलाव येथील हस्तांतरण स्थानक येथे जमा करून खर्डी येथे नेमण्यात येता सदर कचरा वाहतुकीसाठी १० चाकी डंपर्स भाडयाने घेण्यात आलेले असून दररोज कच-याचे वजन करून कचरा डंपिंग ग्राउंडवर नेमण्यात येतो. सदर हस्तांतरण स्थानकामध्ये दररोज सरासरी ३७५ ते४०० टन कचरा जमा होत आहे.
 • ठाणेमहानगरपालिका हद्दीतील शौचालयाची साफसफाई : ठाणे महासभा ठराव क्र. १४१ दि. २४/०८/२००६ नुसार शौचालयांची साफसफाई निगा व देखभाल व किरकोळ दुरुस्तीसाठी प्रति युनिट १००/- व प्रति कुटुंब प्रतिमहा रु. १०/- वसुल करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. मा. महासभेच्या धोरणात्मक निर्णयानुसार सामाजिक संस्थांकडून उदा. सार्व. महिला सामाजिक मंडळे, सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, वाल्मिकी समाज नोंदणीकृत सहकारी संस्था इत्यादी मार्फत कामे करून घेणेकरिता सन २००८ मध्ये निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. निविदा मागविल्यानंतर प्राप्त झालेलेदर प्रतिमाह रु.४८/-, रु.४९/-, रु. ५०/- असे दर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे एवढया कमी दरात संस्था काम करू शकत नसल्याने सदर निविदा मा.स्थायी समितीने ठराव क्र. ४०९ दि.२९/०३/२०१० अन्वयेना मंजूर केल्या आहेत. त्यानंतर फेरनिविदा मागविण्याचा प्रस्ताव केला असता मा. आयुक्त सो. यांनी "वस्ती स्वछता कार्यक्रम" CBO अंतर्गत शौचालयाची साफसफाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार CBO चा प्रस्ताव मा. महासभेपुढे सादर केलेला आहे. ठाणेमहापालिकेच्या शौचालयाचे संदर्भातील माहिती खालीलप्रमाणे आहे. १) सार्वजनिक शौचालयासाठी सन २०१२-२०१३ अर्थसंकल्पात रक्कम रु.२.६० कोटी तरतूद करण्यात आलेली असून मागील वर्षात रु.३३,००,१४९/- खर्च झालेला आहे.
विभागाचा तपशील:
डायघर येथील विकसित करावयाचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प :

ठाणेमहानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन निर्माण होणारा घनकच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेकरिता राज्य शासनाकडून मौजे डायघर येथे सर्व्हे क्र. १५,१६,१७,१८,१९ मधील एकूण १८.८९ हेक्टर जमीन सन २००५ मध्ये ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झाली. सदर जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिदिन ५०० मेट्रिक टन घनकच-याची विल्हेवाट लावणेकरिता मे. हेंजर बायोटेक एनर्जीज प्रा.लि.या कंपनीस १० हेक्टर जमीन २९ वर्षाकरिता देवून बी.ओ.टी. तत्वावर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणेस महासभा ठराव क्र. ४५ दि. १७/०६/२००६ अन्वये मंजुरी देण्यात आली होती. मौजेडायघर येथे प्रतिदिन ५०० मेट्रिक टन घनकच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेकरिता सदर कंपनीबरोबर प्रकल्प उभारणीसाठी दि.३१/०८/२००८ रोजी करारनामा करून कार्यादेश देण्यात आला होता. सदर करारनाम्यानुसार प्रस्तावित जागेवर पावसाळ्याचा कालावधी वगळून सहा महिन्यात प्रकल्प उभारणे बंधनकारक होते. अपवादात्मक परिस्थितीत हा कालावधी १२ महिनेपर्यंत वाढवून देण्याची तरतूद आहे. परंतु ठेकेदाराने जागा ताब्यात घेण्याचा सन २००८ मध्ये आवश्यक तो करारनामा करून सुद्धा प्रकल्प उभारणेस कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलेले नाहीत. जवळपास तीन वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा विहित मुदतीत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे कंपनीस शक्य न झाल्यामुळे दैनंदिन निर्माण होणा-या घनकच-याची विल्हेवाट लावणे ठाणेमहानगरपालिकेस जिकरीचे झाले आहे.

दैनदिन कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात न आल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मे. हेंजर बायोटेक प्रायव्हेट एनर्जीज प्रा. लि. या संस्थेने राजकोट महानगरपालिका व मीरा भाईंदर महानगरपालिका येथील उभारलेल्या प्रकल्पाची पहाणी डायघर विरोध करणा-या नागरिकांचे समाधान न झाल्यामुळे त्यांचा विरोध आजपण कायम आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत संबंधित ठेकेदार यांनी चालवित असलेल्या प्रकल्पातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे तेथील नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. वेळोवेळी प्रकल्प बंद करून निदर्शने करीत आहेत हि बाब विचारात घेता मे. हेंजर बायोटेक प्रायव्हेट एनर्जीज प्रा. लि. या संस्थेकडून डायघर येथेप्रकल्प उभारणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती विचारात घेता तसेच ठेकेदाराशी केलेल्या अटी व शर्ती नुसार अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता न होता प्रकल्प उभारणेस विलंब झालेला आहे हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही. संबधित ठेकेदाराला ठाणे महानगरपालिकेकडून वेळोवेळी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देखील प्रकल्प उभारणेचे काम पूर्ण होऊ शकलेनाही त्यामुळे डायघर येथे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरांवर कार्यान्वित असलेल्या आधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुर्गंधी विरहीत आधुनिक स्वरूपाचा नव्याने प्रकल्प उभारून नागरिकांची गैरसोय होणार नाही व घनकच-याची विल्हेवाट प्रश्न निकालात येऊ शकले ही बाब विचारात घेऊन मे.हेंजर बायोटेक प्रायव्हेट एनर्जीज प्रा. लि. या कंपनीस बीओटी तत्वावर मौजे डायघर येथे प्रकल्प उभारणीस यापुर्वी महानगरपालिका महासभा ठराव क्र. ४५ दि. १७/०६/२००६ अन्वये दिलेली मान्यता मा. महासभा ठराव क्र. २५१ दि. २४/११/२०१० अन्वये रद्द करण्यात आलेली आहे.

तसेच आधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुर्गंधी विरहित प्रकल्प उभारण्याचे व दुर्गंधी विरहित शास्त्रोक्त क्षेपणभुमी निर्माण करण्याचे अनुषंगाने प्रशासनाने निविदा मागविण्यास व आधुनिक तंत्र प्रणालीमध्ये मे. हेंजर बायोटेक प्रायव्हेट एनर्जीज प्रा. लि. यांनी निविदा भरून अटी व शर्ती पूर्तता करीत असल्याने व अन्य सर्व बाबी समान असल्याने मे. हेंजर बायोटेक प्रायव्हेट एनर्जीज प्रा.लि. याला प्राधान्य देणेबाबत मा. महासभेने ठरावात नमुद केलेले आहे. त्यानुसार मे.हेंजर बायोटेक प्रायव्हेट एनर्जीज प्रा.लि. यांचेसोबत करण्यात आलेला करार कार्यालयीन आदेश क्र ठामपा/घकव्य/आयुक्त-३८ दि.२१/०४/२०११ नुसार रद्द करण्यात आलेला आहे. याकामी E.O.I मागविण्यात आलेले असून एकूण ११ E.O.I प्राप्त झालेले आहेत.

घनकचरा प्रक्रियेसंबंधी सध्या जगात उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मौजेडायघर येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीस मा. महासभेने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दि.१४/०६/२०११ रोजी E. O. I मागविण्यात आलेले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रात कचरा विल्हेवाटीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने "सामाईक भरावभुमी " विकसित करणेबाबत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी शास्त्रोक्त सामाईक भुमी विकसित करावयांच्या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी संमती पत्र देणेबाबत मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगरप्रदेश विकास यांचेकडून कळविण्यात आलेहोते. प्राधिकरणाने त्यासंदर्भात दोन पर्याय सुचविले होतो त्याअनुषंगाने

पर्याय १ : स्थानिक स्तरावर दैनंदिन कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. परंतुकचरा प्रक्रियेतून उर्वरित निष्कीर्य कचरा सामाईक भरावभुमीत विल्हेवाटीसाठी पाठविला जाईल.

अथवा

पर्याय १ :

स्थानिक स्तरावर दैनंदिन निर्माण होणा-या संपूर्ण कच-यावर प्रक्रिया तसेच प्रक्रियेनंतरची उर्वरित कच-याची संपूर्ण जबाबदारी "सामाईक भरावभुमी " येथेच पार पाडली जाईल.

सामाईक भरावभुमीचा विकास व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कच-याचेअथवा कचरा प्रक्रियेतून उर्वरित कच-याचे परिवहन हे एकात्मिकृत तत्वावर असल्याने हा देखील सामाईक भरावभुमीचा एक भाग राहील, जेणेकरून विकसित करण्यात येणा-या कोणत्याही भरावभुमीचा वापर करणे वापरकर्त्यांना शक्य होईल व त्यामुळे परिवहनावरील खर्चात बचत होईल.

पर्याय १ व २ चे अवलोकन करता, सध्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये डायघर येथील जागेव्यतिरिक्त घनकचरा प्रक्रियेसाठी अन्यत्र जागा महापालिकेच्या मालकीची नाही. त्यामुळे मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडील सामायिक भरावभुमि प्रक्रियेमध्ये ठाणेमहानगरपालिकेने सहभागी होताना पर्याय २ अंतर्गत सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणेबाबत प्रस्ताव मा. महासभेकडे सादर करण्यात आला. त्यानुसार मा. महासभेनेमहापालिका ठराव क्र. २८ दि. २३/०६/२००९ पारित केला असून, त्याबाबत मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास कळविण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून याकामी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आणखी माहिती :
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे खालीलप्रमाणे कर्मचारी कार्यरत आहेत.
पदनाम संख्या . पदनाम संख्या
उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन विभाग ) ०१ . सहाय्यक आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन विभाग ) ०१
वैद्यकीय अधिकारी (घन कचरा व्यवस्थापन विभाग ) ०१ . मुख्य स्वच्छता निरिक्षक ०१
अति. मुख्य स्वच्छता निरिक्षक ०१ . उपमुख्य स्वच्छता निरिक्षक ११
स्वच्छता निरिक्षक ३२ . हेड मुकादम ०५
मुकादम + सुपी. फिल्डवर्कर ४८ . वाहनचालक ५७
जेसीबी वाहनचालक (१ कायम + १ स.का.वाहनचालक) ०२ . लघुलेखक तथा टंकलेखक ०१
अ वर्ग लिपिक ०१ . लिपिक ०३
सफाई कामगार २३०३ .
ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत एकूण ९ प्रभाग समित्या असून प्रत्येक समित्या असून प्रत्येक प्रभाग समिती निहाय असणा-या हजेरी शेडवर काम करणारे महापालिकेचे कर्मचा-याची माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
प्रभाग समितीचे नाव हजेरी शेडचे नाव महापालिकेच्या कर्मचा-यांची संख्या एकूण कर्मचारी
चितळसर मानपाडा प्रभाग समिती १) कासारवडवली, वाघबीळ
२) पातलीपाडा,मानपाडा
३) बाळकुम, कोलशेत, ढोकाळी
४) माजिवडा
४६
७६
९२
५४
२६८
वर्तकनगर प्रभाग समिती १) शास्त्रीनगर
२) समतानगर
३) गांधीनगर, शिवाईनगर
४) वर्तकनगर, चिरागनगर
४९
४८
७२
६५
२३४
रायलादेवी प्रभाग समिती १) जयभवानी
२) लोकमान्यनगर
३) हनुमाननगर
४) शांतीनगर, रायलादेवी
५४
३८
५१
५२
१९५
नौपाडा प्रभाग समिती १) कोपरी गार्डन
२) पाचपाखाडी
३) क्रिकरोड
४) स्टेडीयम
५) घंटाळी
६) शाहूमार्केट
६०
८८
९२
५८
४०
४३
३८१
मुंब्रा प्रभाग समिती १) रेतीबंदर
२) दिवा, शिळ, रशिद कंपाउंड
३) मुंब्रा
४) कौसा
५) मुंब्रा मार्केट
४१
८१
८६
६२
४३
३८१
उथळसर प्रभाग समिती १) उथळसर
२) जोगीला मार्केट
३) राबोडी
४) टेंभीनाका
५) आंबेडकर हजेरी शेड
३९
६०
६२
८९
३५
२८५
वागळे प्रभाग समिती १) रायलादेवी
२) शिवाजीनगर
३) किसननगर नं १ व २
४) लुईसवाडी
४१
२९
५६
५४
१८०
कोपरी प्रभाग समिती १) चेंदणी कोळीवाडा
२) कोपरी (पुर्व)
३) कोपरी गाव
६१
४३
६९
१७३
कळवा प्रभाग समिती १) खारेगाव
२) विटावा
३) कळवा
५५
४१
७७
१७३
C.P.Tank मुख्य हजेरी शेड १२२ १२२
एकूण २३५९ २३५९
उपरोक्त प्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे २३५९ रस्ते साफसफाई कामासाठी ठेकेदाराचे ९२५ तसेच घंटागाडीवरील ठेकेदाराचे ३५७ असे एकूण ३६५३ कर्मचारी आहेत.
रस्ते सफाई : ठाणे महानगपालिका हद्दीतील रस्ते साफसफाई खाजगी ठेकेदारांमार्फत करण्यात येते. त्यासाठी एकूण १९ ठेकेदारांकडून सदरचेकाम करून घेण्यात येत असून रस्त्यांची लांबी २३६ कि.मी. आहे. सदर ठेकेदार दिनांक ०१/०३/२०११ पासून कार्यरत आहे.
रस्तेसाफसफाई बाबतची गटनिहाय माहिती
ठेकेदाराचे नाव कर्मचा-यांची संख्या . ठेकेदाराचे नाव कर्मचा-यांची संख्या
मे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन कंपनी ३९ . मे. व्यंकटेश्वर भटकी जमात म.का.स. ४२
मे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन कंपनी ५० . मे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन कंपनी ६१
मे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन कंपनी ६४ . मे. विजय द.पाटील ३८
मे.सिद्धीविनायक सर्व्हिसेस ४५ . मे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन कंपनी ४०
मे. अभिषेक कन्स्ट्रक्शन ३८ . मे. अभिषेक कन्स्ट्रक्शन ५०
मे. अभिषेक कन्स्ट्रक्शन ५२ . मे. अभिषेक कन्स्ट्रक्शन ६१
मे. अमृत एंटरप्रायझेस ५७ . मे. अमृत एंटरप्रायझेस ४६
मे. विजय द. पाटील ४७ . मे. अमृत एंटरप्रायझेस ७१
मे. अमृत एंटरप्रायझेस ३९ . मे. कल्पेश एंटरप्रायझेस ५८
मे. व्यंकटेश्वर भटकी जमात म.का.स. २७ . मे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन कंपनी २६
. एकूण ९५१
उपरोक्त प्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे २३५९ रस्ते साफसफाई कामासाठी ठेकेदाराचे ९५१ तसेच घंटागाडीवरील ठेकेदाराचे ४०४ असेएकूण ३७१४ कर्मचारी कार्यरत आहेत.
घरोघरी घनकच-याचे संकलन व वाहतूक (घंटागाडी योजना) :

घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी ) नियम २००० अन्वये महापालिकेने घरोघरी कचरा संकलनासाठी ९४ मोठया बंद स्वरूपाच्या घंटागाडया व ६१ छोटया बंद स्वरूपाच्या घंटागाडया भाडेतत्वावर कंत्राटारामार्फत वापरण्यात येत असून त्याअनुषंगाने घरोघरीचा कचरा संकलन करून वाहतुक करण्यात येते.

तसेच ज्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाहन पोहचू शकत नाही अशा झोपडपट्टया, डोंगर उतारावरील वस्त्यांमध्ये घरोघरी निर्माण होणारा कचरा स्थानिक स्वयंसेवी संस्थामार्फत गोळा करण्याचे काम करून घेण्यात येत आहे. तसेच प्रायोगिक तत्वावर काही रस्त्याच्या साफसफाई कचरा वेचक महिलांना संघटीत करून त्यांचेमार्फत करून घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत ३४४ कचरा वेचकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

घंटागाडीबाबतची माहिती
अ. क्र. ठेकेदाराचे नाव वाहनांचा प्रकार व संख्या
शांता पाटील चार चाकी - १३
मे. एम. कुमार ग्रुप तीन चाकी - ४३
सहा चाकी - ७१
मे. अमृत एंटरप्रायझेस तीन चाकी - १८
सहा चाकी - २५
M/s Antoni Handling West मोठेकॉम्पंक्टर - ९ (क्षमता ११ क्युबिक )
लहान कॉम्पंक्टर - ९ (क्षमता ६ क्युबिक )
एकूण १८८
वाहन व्यवस्था:
महापालिका हद्दीमध्ये निर्माण होणारा कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी खालीलप्रमाणे वाहनांचा वापर केला जातो.
१) डंपर प्लेसर ०९ महापालिकेचे
२) डंपर ११ महापालिकेचे
३) डंपर २१ महापालिकेचे
४) डोजर ०२ महापालिकेचे
५) जेसीबी ०२ महापालिकेचे
६) मिनी डोअर रिक्षा १० महापालिकेचे
७) दहा चाकी डंपर्स १० ठेकेदाराचे
८) घंटागाडया १७० ठेकेदाराचे
ठाणेमहापालिका हद्दीत शौचालयाची संख्या खालीलप्रमाणेआहे.
अ. क्र. शौचालयाचे प्रकार एकूण सिट्स
ठाणेमहापालिकेचे स्वत: बांधलेले १४०१
बांधा वापरा तत्वावर बांधण्यात आलेली ७६२
सुलभ शौचालये ९४९
निर्मल भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेली शौचालये ७१३६
एकूण १०२४८
Rules & Notification of SWM:
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department