Thane Municipal Corporation
विविध विभाग
माहिती व जनसंपर्क विभाग
विभाग प्रमुख श्री. संदीप माळवी (उप आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३६४७७९, +९१-२२-२५३६६९९६, +९१-९७६९०७१३१४      विस्तार क्रं. - ५११/५१२
ई-मेल prodks@thanecity.gov.in, pro@thanecity.gov.in
विभागाची कामे:
 • राष्ट्रीय कार्यक्रम, महापालिका वर्धापन दिन, राष्ट्रीय नेतेजयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करणे तसेच इतर महापालिकेच्या दृष्टीनेअंतर्गत असलेले मह्त्वाचे कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि व्यवस्थितरित्या पार पाडणे .
 • महापालिकेशी संबधित असलेले वेगवेगळ्या प्रकारचे उद्घाटनाचे कार्यक्रम तसेच सत्कार समारंभ आयोजन करणे व पार पाडणे.
 • महापालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या बातम्या व छायाचित्रे प्रसिद्धीसाठी पाठवणे .
 • महापालिकेच्या विविध विकास कामांना प्रसिद्धी देणे .
 • राज्यस्तरीय व स्थानिक वृत्तपत्रांना आणि वृत्तवाहिन्यांना महापालिकेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची छायाचित्रे बातम्यांसह पाठवणे व त्यास प्रसिद्धी देणे .
 • वृत्तपत्रांतील महापालिकेचे संबंधित महत्वाच्या बातम्या, तक्रारी, सूचना, जाहिराती यांची कात्रणे काढून त्यांचा संच बनवून मा.आयुक्तांकडे दररोज अवलोकनार्थ पाठवणे.
 • वेगवेगळ्या कार्यक्रमांचे कृष्ण धवल / रंगीत फोटो घेण्याची व्यवस्था करणे तसेच छायाचित्रण करणे.
 • महापालिकेतील पदाधिकारी आणि वरिष्ट अधिकारी यांना आवश्यकती वृत्तपत्रे पुरवणे, त्यांचे हिशेब ठेवणे आणि वृत्तपत्र, बिले, छायाचित्रणे , टी.व्हि कव्हरेज बिले अदा करणे .
 • महापालिकेच्या विविध विभागांकडील विकास कार्यक्रमांच्या जाहिराती, निविदा सूचना स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करणे .
 • महापालिकेची नागरी दैनंदिनी, दिनदर्शिका तयार करणे, त्याची छपाई करून त्याचे विविध विभागांना वितरण करणे .
 • महापालिकेच्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजन करणे.
 • धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेकडील प्रशासकीय कामकाजावर माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियंत्रण ठेवणे.
 • नागरी संशोधन केंद्र येथील प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 • राम गणेश गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह व तरण तलावांच्या प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 • महापालिका लोकशाही दिनाचेआयोजन करणे.
 • महापालिकेच्यावतीने विविध जनजागृती मोहिमा राबवणे उदा.पल्स पोलियो, स्वच्छता मोहीम, पर्यावरण मोहीम.
 • महापालिकेच्या मा.सर्वसाधारण सभेच्या प्रश्नोत्तरांचे संकलन करणे .
 • मा. पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांनी आयोजित केलेल्या, 'जनता दरबार ' मधील महापालिका कार्यक्षेत्रांतील तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे तक्रार निवारणार्थ पाठविणे
 • महापालिकेकडील सर्व विभागांशी समन्वय ठेऊन त्यांच्याकडील प्रकल्पांची प्रसिद्धी करणे.
 • महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणा-या सर्व सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करणे.
 • महापालिकेच्या विविध प्रकल्पांवर आधारित बुकलेट्स, माहितीपुस्तिका, हस्तपत्रक (handbills) पोस्टर्स बनविणे व शहरामध्ये विविध संस्थाना, नागरिकांना वितरीत करणे .
 • महापालिकेच्या विविध महत्वाच्या प्रकल्पांवर आधारित इंग्रजी व मराठीमधून माहितीपर (डाक्युमेंटरी), टी.व्हि जाहिरात बनविणे व ती सर्व स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करणे.
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department