Thane Municipal Corporation
विविध विभाग
आस्थापना / कार्मिक विभाग / मागासवर्ग कक्ष
विभाग प्रमुख श्री.ओमप्रकाश दिवटे (उप. आयुक्त)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३१५९०, +९१-२२-२५३३१७७७, +९१-९९३०६०६६६६      विस्तार क्रं. - २३२/२०७/५२२/५१९
ई-मेल dmchq@thanecity.gov.in, po@thanecity.gov.in
विभागाची कामे:
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क क्रमांक
श्रीमती वर्षा दिक्षीत कार्मिक अधिकारी +91-22-25331590-207 / +91-7045000871
श्रीमती रश्मी गायकवाड (अति. कार्यभार) आस्थापना अधिक्षक +91-7507908279

 • विविध संवर्गात पदनिर्मिती (तांत्रिक व अतांत्रिक ) बाबत कार्यवाही करणे. शासनाकडून पदनिर्मितीस मान्यता घेणे.
 • संवर्गात पदभरती करणे.
 • वारसतत्व व अनुकंपातत्वाने नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करणे.
 • प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांचे वेतन व इतर पत्रव्यवहार करणे.
 • पदोन्नती व बदल्या.
 • आस्थापना खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे.
 • मागासवर्ग कक्षाकडील राखीव प्रवर्गाचे रोस्टर अद्ययावत ठेवणे.
 • विभागीय चौकशी / निलंबन.
 • महापालिका कर्मचारी / अधिकारी यांचेसाठी प्रशिक्षण आयोजित करणे.
 • कर्मचारी / अधिका-यांची मालमत्ता विवरणपत्र प्राप्त करून घेणे. (वर्ग १ ते ३ ).
 • कामगार संघटनांशी कर्मचा-यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा व तत्सम बाबी.
 • अधिकारी / कर्मचा-यांचे वेतन व इतर प्रदाने.
 • अधिकारी / कर्मचा-यांची वेतन निश्चिती करणे.
 • वेतनश्रेणी करार.
 • एल. आय. सी. मासिक हप्ता कपातीबाबत कार्यवाही व अभिलेख.
 • न्यायालयीन प्रकरणे.
 • महापालिका अधिकारी / कर्मचा-यांचे सेवापुस्तक अद्ययावत ठेवणे.
 • केंद्रिय माहिती अधिकार अधिनियमा अंतर्गत माहिती अधिकार / अपिल.
 • अधिकारी / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल जतन करणे.
 • नाहरकत प्रमाणपत्र (पासपोर्ट / परदेश प्रवास परवानगी )
 • तारांकीत / अतारांकीत प्रश्न / शासन पत्रव्यवहार.
विभागाचा तपशील:
कार्मिक / आस्थापना विभाग / मागासवर्ग कक्ष :
१) महापालिकेतील एकूण मंजूर पदांची संख्या : ९६२६ स्थायी + २०३ अस्थायी
२) मंजूर पदांचे वर्गीकरण : वर्ग १ - २४१ + १३ अस्थायी
वर्ग २ - १६८ + ७ अस्थायी
वर्ग ३ - ३१११ + १४६ अस्थायी
वर्ग ४ - ६१०६ + ३७ अस्थायी
३) भरलेली पदे : मार्च २०१३ चे आस्थापना सुचीनुसार
वर्ग १ - १७० + ४ अस्थायी
वर्ग २ - ११० + ४ अस्थायी
वर्ग ३ - २२५८ + ३७ अस्थायी
वर्ग ४ - ५०४८ + ३५ अस्थायी
४) सेवाभरती नियम : महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका सेवा (सेवाभरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ च्या आधारे ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रारूप सेवाभरती व सेवांचे वर्गीकरण नियम २००८ तयार करण्यात येऊन त्यास मा.महासभेची मान्यता घेऊन शासन मान्यतेस सादर करण्यात आले आहे.
५) वेतन व इतर प्रदाने १) महापालिका कर्मचारी यांना सहाव्या वेतन संरचनेनुसार वेतन अदा करण्यात येते.
२) महापालिका अधिकारी कर्मचा-यांना दरवर्षी रु.५०००/- वैद्यकीय भत्ता देण्यात येतो. जे कर्मचारी ग्रुप हेल्थ विमा पॉलिसी (हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी) काढतील त्यांचा दरवर्षी रु.१००००/- पर्यत रिइम्बर्समेंट महापालिका भरते.
३) दोन वर्षातून एकदा अधिकारी / कर्मचारी यांना प्रवासभत्ता अदा केला जातो.
४) ठाणे महापालिका अधिकारी कर्मचा-यांना संवर्गनिहाय खालीलप्रमाणे अनुय भत्ते अदा करण्यात येतात. फिरती भत्ता, धुलाई भत्ता रक्कम हाताळणी भत्ता, टंकलेखन भत्ता, मिटिंग भत्ता, स्पेशल ड्युटी भत्ता, घाण भत्ता, स्कुटर मोटर सायकल भत्ता, गणवेश भत्ता, २४ तास ड्युटी भत्ता, सायक्लोस्टाईल मशीन भत्ता, सायकल भत्ता, धोकादायक कामाचा भत्ता, हत्यार भत्ता, संगणक हाताळणी भत्ता, खास भत्ता, इंधन भत्ता, अपंग भत्ता.
६) चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसाठी राबविण्यात येणा-या : योजना / देण्यात येणा-या सुविधा चतुर्थश्रेणी कर्मचारी सफाई कामगार यांचेसाठी खालील योजना राबविण्यात येतात.
१)शासन निर्णयानुसार ज्या सफाई कर्मचा-यांच्या सेवा कालावधी २५ वर्ष झाला आहे अशा सफाई कर्मचा-यांना मोफत सदनिका देण्याची कार्यवाही सुरु आहे.
२) वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्यांच्या वारसास अनुकंपा तत्वाने शासन निर्णयानुसार नियुक्ति देणेची कार्यवाही करण्यात येते.
3)सफाई कामगार संवर्गातील कर्मचा-यांच्या वारसास वारसा तत्वाने नियुक्ति देण्यात येते.
७) विशेष भरती मोहिम : विशेष भरती मोहिमेअंतर्गत अनु. जमात या प्रवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत कार्यवाही करण्यात आली. तसेच अपंग प्रवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत कार्यवाही करण्यात येते.


मागासवर्ग कक्ष
१) मागासवर्ग कक्षाकडील राखीव प्रवर्गाचे रोस्टर अद्ययावत ठेवणे.

२) अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे.

३) भरलेल्या व रिक्त पदांचे आरक्षण / अनुशेष देणे.

४) केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत माहिती अधिकार / अपिल

५) कामकाजाच्या अनुषंगिक संगणकीकरण करणे. तसेच शासनाकडील पत्रे / तिमाही गोषवारा / डी. ओ. लेटर, जात वैधता अहवाल, कायमपनाचे अहवाल, पदोन्नतीचे अहवाल इत्यादी संबंधीचे पत्रव्यवहार टंकलिखित करून उचितवेळी माहिती पुरवणे

६) अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जात वैधतेच्या अहवालाचे पत्र तयार करून आस्थापना विभागाकडे सेवा पुस्तकात नोंद घेणेसाठी संबंधित संवर्ग लिपिकांकडे पाठवणे.

७) जात वैधता अहवालाचे पत्र व त्याच्या छायांकित प्रती अधिकारी / कर्मचारी यांच्या जात पडताळणी फाईलला अथवा जात प्रवर्गाच्या जाती निहाय फाईलला लावणे.

ठामपाच्या आस्थापनेवरील मागासवर्गीय कक्षाकडील एकूण संवर्ग
अ.क्र. वर्ग सरळसेवेतील संवर्ग पदोन्नतीतील संवर्ग एकूण
1.1221840
2.2122234
3.314628174
4.4461662
एकूण 22684310
विभागाची कामगिरी :
आजतागायत प्रशासकीय सुधारणा अंतर्गत ४३४४ कर्मचारी / अधिकारी यांना विविध शासन संस्था व विषय तज्ञामार्फत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department