Thane Municipal Corporation
विद्युत विभाग
विभाग प्रमुख श्री. सुनील द.पोटे.(उप नगर अभियंता)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३१५९०, +९१-९१६७२५१०२०      विस्तार क्रं. - ३००
ई-मेल dceelect@thanecity.gov.in
विभागाची कामे:
 • भांडवली व निगा व देखभाल विषयक कामे म्हणजेच पथदिप/उद्यानातील लाईट लावणे, महापालिकेच्या इमारती व इतर स्थावर मालमत्ता येथील विद्युत संच मांडणी निगा व देखभाल विषयक कामे करणे.
 • नविन पथदिप लावणे, उद्यानात लाईटींग करणे, इमारतीचे विद्युतीकरण इ. आवश्यकतेनुसार करणे.
 • ठा. म. पा. क्षेत्रात वाहतुक नियंत्रकाची निगा व देखभाल पाहणे व आवश्यकतेनुसार नविन वाहतुक नियंत्रक उभारणे.
 • महापालिका क्षेत्रामध्ये उर्जा बचत व उर्जा संवर्धन प्रकल्प राबविणे.
 • MNRE, GOI, नवी दिल्ली यांचेसौर शहर विकसित करणेचे योजना महापालिकेत राबविणेअंतर्गत ठाणे शहरात सौर उर्जाकेंद्रे कार्यान्वित करणे.
विभागाचा तपशील:

ठाणेमहानगरपालिकेच्या अखत्यारीत सर्व प्रकारच्या विद्युत विषयक बाबी म्हणजेच भांडवली व निगा, देखभाल विषयक कामे जसे पथदिप, उद्यान लाईट लावणे, इमारतींचे विद्युतीकरण करणे, महापालिकेच्या स्थावर मालमत्तेची विजबिले अदा करणे, विद्युत विभागाचे कामकाज मुंबई प्रांतिक महानगरपालिका १९४९ नियम कलम नं. २४९,२५१ व २५२ अन्वये केले जाते.

उर्जा बचत व उर्जा संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय कार्यवाहीमुळे राज्यस्तरावरील व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार महापालिकेस प्राप्त झालेले आहे. तसेच केंद्र शासनाने ११व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ठाणे शहराची सौर शहर विकसित करण्यासाठी निवड केली आहे.

आणखी माहिती :
विद्युत संचमांडणी
पथदिप/उद्यान लाईट ३२३३५ . गगनदिप ६७
LED लाईट २३५ . Induction Fixtures २२८
वाहतूक नियंत्रक ३१ .
विजबचत प्रकल्प
सौर उष्णजल संयत्र ३५५५० LPD . सौर ब्लिकर्स ३९
सौर फोटो व्होल्टीक ६१ kwp . सौर उर्जेवर आधारित वाता.यंत्रणा १६० टी
सोलार ट्राफिक सिस्टीम . बायोमिथेनेशन प्लांट १५ TPD
खर्च (२०११ - २०१२)
 • महापालिकेच्या पथदिपाचा भांडवली व निगा देखभाल खर्च रु. ३३४.०३ लक्ष
 • महापालिकेच्या पथदिपांच्या विज बिलांचा खर्च रु.१३४५.१९ लक्ष
 • महापालिकेच्या इमारतींच्या विद्युत संच मांडणी निगा व देखभालीचा व दुरुस्ती खर्च रु. ५७.८९ लक्ष
 • महापालिकेच्या इमारतींच्या विज बिलांचा खर्च रु.१७७.६५ लक्ष
 • Expenditure for Traffic Signal Operation and maintenance : Rs.19.90 Lac's
 • महापालिकेच्या वाहतुक नियंत्रकाच्या निगा देखभाल दुरुस्ती खर्च रु.१९.९० लक्ष
विद्युत विभागाचेउर्जाबचत संदर्भात प्रकल्प
 • महापालिकेच्या इमारतींसाठी सौर उर्जेवर विजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविणे.
 • महापालिकेच्या इमारतींसाठी सौर उष्ण जल सयंत्रे बसविणे.
 • छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे सौर उर्जेवर आधारित वातनुकूलन यंत्रणा बसविणे.
 • बायोमिथेनेशन प्लांट १५ TPD.
 • महापालिकेच्या खंडूरांगणेकर बॅडमिंटन हॉलसाठी उर्जा कार्यक्षम लाईटींग लावणे.
 • इंडक्शन LED लाईटींग पथदर्शी प्रकल्प.
विभागाची कामगिरी :
 • उर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामांबद्दल मेडा संस्थेचा सन २००३ सालासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणेमहापालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • उर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामांबद्दल मेडा संस्थेचा सन २००४ सालासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणेमहापालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • महापालिकेच्या इमारतींसाठी उर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामांबद्दल मेडा संस्थेचा सन २००५ सालासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणेमहापालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • ठाणे महापालिकेस केंद्र शासनाकडून इमारती या संवर्गात 'राष्ट्रीय उर्जा संवर्धन २००५' हे प्रथम पारितोषिक मा.राष्ट्रपती यांच्या हस्तेप्राप्त झाला.
 • उर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या संस्थेचा सन २००६ सालासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • उर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्येउल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या संस्थेचा सन २००७ सालासाठी शासकीय इमारती या संवर्गात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणेमहानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या संस्थेचा सन २००८ सालासाठी राज्यस्तरीय Continuous excellance पुरस्कार ठाणेमहानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या संस्थेचा सन २००८ सालासाठी शासकीय इमारती या संवर्गात राज्यस्तरीय Continuous excellance पुरस्कार ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या संस्थेचा सन २००९ सालासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणेमहानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण या संस्थेचा सन २००९ सालासाठी शासकीय इमारती राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणेमहानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
 • सौर उर्जेवर आधारित वाता.यंत्रणा बसविणे याबाबत मेरीट प्रमाणपत्र "Skotch Digital Inclusion Awards २०११".
 • कळवा हॉस्पीटल सौर उर्जेवर आधारित वाता.यंत्रणेसाठी इंडिया टेक एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त झाले.
 • बेस्ट पर्पाम जॉईन्ट अवार्ड सौर उष्ण जल सयंत्रेबसविणेकरिता MNRE, GOI, India पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department