Thane Municipal Corporation
विविध विभाग
समाज विकास विभाग
विभाग प्रमुख वर्षा दीक्षित (उपायुक्त - अतिरीक्त कार्यभार )
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक +९१-२२-२५३३१५९०, +९१-२२-२५४११०५३, +९१-७०४५०००८७१      विस्तार क्रं. - ३६० /३२९ /३३०
ई-मेल dmcswm@thanecity.gov.in
विभागाची कामे:
 • महिला व बालकल्याण योजना.
 • सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना (केंद्र शासन पुरस्कृत शहरी भागातील दारिद्र रेषेखाली कुटुंबासाठी योजना )
 • महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास आधीनियम १९७१ अन्वये अंमलबजावणी करणे.
 • अपंग कल्याणकारी योजना.
विभागाचा तपशील:
विभाग प्रमुख पदनाम दूरध्वनी क्र/ भ्रमणध्वनी क्र.
श्री.एस.आर.पाटोळे. समाजविकास अधिकारी +९१-९९६९२०१६६०
श्री.डी.एन.वाघमारे. समाजविकास अधिकारी +९१-९७६९०७३२७२
श्री. डी.एस.गुंडप. उपसमाजविकास अधिकारी +९१-९०२९९२०२७१
श्रीमती. वर्षा दिक्षीत विशेष कार्य अधिकारी - समाजविकास विभाग कार्यालय : + 91-22-25415501
भ्रमणध्वनी : +91-7045000871
आणखी माहिती :
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना (केंद्र शासन पुरस्कृत शहरी भागातील दारिद्र रेषेखाली कुटुंबासाठी योजना)
प्रस्तावना :- प्रस्तावना :- भारतीय राज्य घटनेच्या ७४व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या कामामध्ये दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमाचा अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे नागरी दारिद्रय निर्मुलन हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्वाचे काम आहे. यासाठी केंद्र शासनाने सुर्वण जयंती शहरी रोजगार योजना दि.१ डिसेंबर,१९९७ पासून शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाकरिता सुरु केली आहे.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या शहरी दारिद्रय रेषेखालील जीवनमान असणा-या व शहरी भागात राहणा-या दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षण झाल्यानंतर पात्र ठरणा-या गरीब व्यक्ती या योजनेच्या लाभार्थी असून नियोजन आयोगाने कुटुंबाचे दरमहा उत्पन्न रु. ५९१.७५ पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना योजनेचे लाभ दिले आहेत. या योजने अंतर्गत खालील घटक योजना आहेत.

सन २००५ मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणामधील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्याची यादी मा. नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे कार्यालयाकडून दि.२६/११/२०१० रोजी ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झाली आहे. नगरपरिषद प्रशासन संचालनालय भौतिक / आर्थिक उद्दिष्ट देण्यात येते. त्यान्वये सदरच्या योजनेची अंमलबजावणी महापालिकेमार्फत करण्यात येते. योजनेची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे.
योजनेची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे.
 • स्वयंरोजगार : नागरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना छोटे उद्योग उत्पादने, पारंपारिक सेवा, व्यवसाय करण्यासाठी प्रोस्ताहित केले जाते. या योजनेमध्ये लाभार्थींना बँकाकडून रु. २,००,०००/- पर्यत अनुदान देण्यात येते लाभार्थीने प्रकल्प किमतीच्या ५% रक्कम बीज भांडवल म्हणून गुंतवायची असते. कर्जाची परतफेड ३ ते५ वर्षेपर्यंत करायची असते.
  यामध्ये समाजातील विविध घटकातील तरुण तरुणी, सुशिक्षित बेरोजगार, छोटे उद्योग व उत्पादने करू शकतील. यासाठी पुढील प्रमाणे पात्रता आवश्यक आहे .
  वय : १८ वर्षे पुर्ण
  कागदपत्राची पूर्तता : व्यवसायाशी निगडीत प्रकल्प अहवाल उदा. वाहन - कोटेशन, ड्रायव्हिंग लायसन,पनकार्ड,कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र गाडीचा वापर कोठे होणार याबाबतचे हमी पत्र इ.
 • स्वयंसहाय्यता / बचतगट / बचत व पतसंस्था :- वस्तीत राहणा-या ५ दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक एक महिला घेऊन गट बनविण्यात येतो. स्वयंसहाय्यता गटाचे रुपांतर बचत गटात व्हावेयासाठी गटातील महिलांना काटकसरीने बचत करणे, कर्ज घेणे,परतफेड करणेया आर्थिक व्यवहारांची माहिती समूह संघटक मार्फत दिली जाते. गटातील महिला दर महिन्याला ठराविक रक्कम बचत करतात. ज्या बचत गटाने यशस्वीरित्या सहा महिनेपूर्ण केले असेल त्यांना शासनातर्फे प्रती गट १०,०००/-फिरते भांडवल मिळते. या प्रक्रियेत गटातील स्त्रिया परस्पर विश्वासाने बांधल्या जावून एकजिनसी गट तयार होतो.
 • शहरी महिला स्वयंसहाय्यता कार्यक्रम (महिला व बालकेविकास गट) :- महिला व बालकेविकास डवाका गट म्हणतात. सक्षम बचत गट यशस्वी होऊन सामुहिक व्यवसाय करायचे ठरवतो तेव्हा तो या गटाचा लाभ घेतो. या गटांना व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज मिळते. प्रत्येक गटाला प्रकल्प किमतीच्या ३५% किंवा ३,००,०००/- पर्यंत अनुदान मिळते. व्यवसाय सुरु करण्याचे आणि चालवण्याचे प्रशिक्षण शासनातर्फे देण्यात येते. या गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी आधार केंद्राची सोय आहे. मनपा तर्फेया गटांना दैनंदिन सेवांची कामे प्राधान्याने देण्याची तरतूद केली आहे.
  पात्रता : बचत गटाची स्थापन होऊन ६ महिने पूर्ण झालेले पाहिजे.
  कागदपत्राची पूर्तता : व्यवसायाशी निगडीत प्रकल्प अहवाल उदा.पोळी भाजी केंद्र - साहित्य खरेदीबाबतचे कोटेशन, जागेबाबतचा तपशील इ.
 • सामाजिक संरचना :- दारिद्रय रेषेखालील जास्तीत जास्त दोन हजार कुटुंबांची मिळून एका वस्तीत समाज विकास संस्था बनविण्यात येते. या संस्थेचे नियंत्रण वस्तीतील लाभार्थीच करतात. या संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर होतात. संस्थेतर्फे लाभार्थी निवडून त्यांचे अर्ज भरून घेतले जातात. लाभार्थीना योजने अंतर्गत मिळालेल्या कर्जाच्या परतफेडीवर नियंत्रण ठेवले जाते. समाज विकास संस्थेतर्फे योजनेतील विविध घटकांची माहिती वस्तीतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येते. तसेच इतर शासकीय योजनांची माहिती सुद्धा करून दिली जाते. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचे व्यक्तिगत आरोग्य,शिक्षण, सामाजिक न्याय कायदेविषयक माहिती, प्रौढ साक्षरता, रोजगार, निगडीत प्रबोधन कार्यक्रम घेत येतात. महिलांसाठी विविध सामाजिक कार्यक्रम राबविता येतात. वस्तीतील स्थानिक साधनेआणि गरजा यांचा तपशील नोंदवून त्यांची शहरी रोजगार कार्यक्रमाशी सांगड घातली जाते.
 • प्रशिक्षण :- सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत प्रशिक्षण या घटक योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील इच्छुक व्यक्तीस त्यांनी निवडलेल्या व्यवसायाबाबत त्यांचेमध्ये कौशल्य वृद्धी होऊन बेरोजगारी दूर होण्याचे दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाकडून दिला जातो. ही योजना दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गरिबांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगारांची संधी वाढवते.
  वय : १४ वर्षे पुर्ण
  ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी १८ वर्षे पुर्ण
प्रशासकीय कर्मचारी :
पदनाम एकूण पदनाम एकूण पदनाम एकूण
उपआयुक्त ०१ समाजविकास अधिकारी ०१ उपसमाजविकास अधिकारी ०२
आरेखक ०१ पर्यवेक्षक ०१ प्रकल्प संचालक (सु.ज.श.रो.यो) ०१
समुह संघटक(सु.ज.श.रो.यो.) ०१ भूमापक ०३ मराठी लघुलेखक(स्टेनो) ०१
अ वर्ग लिपिक ०१ लिपिक ०४ शिपाई ०१
बिगारी ०२ स.का. ०१
ठाणे महानगरपालिके विषयी
कार्यालयीन कामकाज
ठाणे शहरातील सुविधा
ठाण्यातील करमणुक
ETender
Town Planning Department
LBT

© 2019 टीएमसी. सर्व हक्क राखीव.
\
\
Designed & Powered by TMC IT Department